बिस्किट खरेदीला गेली, कोट्यधीश होऊन परतली | पुढारी

बिस्किट खरेदीला गेली, कोट्यधीश होऊन परतली

न्यूयॉर्क : आपल्या बँक खात्यात लठ्ठ बॅलन्स असावा, असे प्रत्येकाला वाटते. कारण, प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत व्हायचे आहे. आपल्यापैकी अनेकांनी पिक्चरमध्ये एखाद्या व्यक्तीचे नशीब रातोरात बदलेले पाहिले आहे. वास्तविक आयुष्यात असे अगदी क्वचितच घडते. अमेलिया एस्टेस ही अशीच एक महिला. तिचे नशीब अवघ्या काही मिनिटांमध्ये फळफळले. यासाठी बिस्किट खरेदी करणे हे निमित्त ठरले.

अमेरिकेतील डेली स्टार न्यूज वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, 51 वर्षीय अमेलिया नॉर्थ कॅरोलिना येथे वास्तव्यास आहे. गेल्या शनिवारी ती बिस्किट खरेदी करण्यासाठी एका दुकानात गेली होती. त्यावेळी तिने तिथे 1600 रुपयांचे लॉटरीचे तिकीट खरेदी केले. खरेदी करून झाल्यानंतर तिने ते तिकीट स्क्रॅच करून त्यावरील नंबर पाहिले असता ते मॅच झाले. नंबर मॅच झाल्यामुळे क्षणार्धात ती 16 कोटींची मालकीण बनली. लॉटरी लागल्याचे लक्षात आल्यानंतर तिचा त्या घटनेवर काही काळ विश्वासच बसला नाही.

माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. लॉटरीच्या माध्यमातून मिळालेली ही रक्कम निवृत्तीसाठी वाचवून ठेवणार असल्याचे तिने सांगितले आहे. अमेरिकेतील नियमानुसार तिला दरवर्षी 20 वर्षांपर्यंत दरवर्षी 80 लाख रुपये मिळू शकतात. तथापि, एकरकमी बक्षीस पाहिजे असेल तर 9 कोटी रुपये तिला मिळतील. तिने दुसरा पर्याय तिने निवडला आहे. म्हणजेच तिला लवकरच एकरकमी नऊ कोटी रुपये मिळणार आहेत.

Back to top button