पुढारी ऑनलाईन डेस्क : राघ व चड्ढा आणि परिणीती २४ सप्टेंबर रोजी विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांचे लग्नातील काही व्हिडिओ हळूहळू व्हायरल होताना दिसताहेत. (Parineeti Chopra) उदयपूर येथील लीला पॅलेसमधील या क्यूट कपलचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसताहेत. आता त्यांच्या लग्नातील आणखी एक व्हिडिओ सोशलला व्हायरल झाला आङे, ज्यामध्ये परिणीती राघव यांच्यासाठी ओ पिया हे गाणं म्हणताना दिसते. (Parineeti Chopra)
तिने हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केला असून कॅप्शनमध्ये लिहिलंय- माझ्या पतीला , मी गायलेलं सगळ्यात महत्त्वाचं गाणं.. तुझ्याकडे चालणं, वरातीपासून लपून, हे गाणं गुणगुणतेय… मी तरी काय बोलू… O piya, chal chalein aa
हा व्हिडिओ पाहता पाहता सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की, नेटकऱ्यांनी खूप क्यूट कामेंट्स दिले आहेत. नेटकऱ्यांनी कॉमेंट्समध्ये लिहिलं- Happiest bride ever! ❤️ May God protect your happiness ? And the wedding wouldn't be complete without you singing! So lovely ?, Most beautiful moment of life !! Beautifully sung & potrayed ❤️, Most beautiful moment of life !! Beautifully sung & potrayed ❤️, Most beautiful moment of life !! Beautifully sung & potrayed ❤️ अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडिओला हार्ट इमोजी देखील शेअर केले आहेत.