Latest

Parbhani News : दहावीचे दोन पेपर शिल्लक असताना मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याने जीवन संपवले

अविनाश सुतार

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालुक्यातील खुजडा येथील दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय विद्यार्थ्याने मराठा आरक्षण आणि सगेसोयरे अधिसूचना अंमलबजावणीच्या मागणीसाठी आपले जीवन संपवले. ही घटना गुरूवारी (दि.२१) सायंकाळी उघडकीस आली. स्वराज मुंजाजी कु-हे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. पूर्णा तालुक्यातील मराठा आरक्षणाचा हा दुसरा बळी ठरला आहे. लोणधार येथील आणखी एका युवकाने आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. Parbhani News

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खुजडा येथील स्वराज आपली विधवा आई सरीता, आजी व एक मतीमंद भाऊ यांच्यासह शिक्षणासाठी पूर्णा शहरातील आनंदनगर येथे खोली भाड्याने घेवून राहत होता. त्याचे वडील मुंजाजी कु-हे यांचा आठ वर्षापूर्वी मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे. आई दीड एकर शेती कसून मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती. परिस्थिती हालाखीची त्यात मराठ्यांना आरक्षण नसल्याने चांगले मार्क मिळाले, तरी नोकरी मिळत नाही, अशी खंत तो दहावीच्या परीक्षेचे पेपर सुरु असताना घरी बोलून दाखवत असे. Parbhani News

अखेर दहावीच्या परीक्षेचे दोन पेपर शिल्लक असतानाच स्वराजने गुरुवारी दुपारी टोकाचा निर्णय घेतला. घरी कोणी नसतना गळफास घेऊन आपले जीवन संपवले. शेजाऱ्यांनी याची माहिती पूर्णा पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक नांदगावकर, जमादार रमेश मुजमुले, अजय माळकर यांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यानंतर पार्थिवावर खुजडा येथे रात्री ११ वाजता अंत्यसंस्कार केले.

या प्रकरणी स्वराजचे काका ज्ञानेश्वर कु-हे (रा. खुजडा) यांनी फिर्याद दिली आहे. पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूर्णा पोलिस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT