Latest

परभणी : एटीएसने परभणीतून पीएफआयच्या चौघांना घेतले ताब्यात

मोहन कारंडे

परभणी, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद व नांदेड येथील दहशतवाद विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या जिल्हा शाखेच्या चार पदाधिकार्‍यांना परभणीतून ताब्यात घेतले आहे. मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याशी संबंधित असल्याच्या कारणावरून संशयितांना अटक करण्यात आली आहे. आज गुरूवारी (दि.22) पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असुन संशयित आरोपींची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व त्याच्याशी संबंधित लिंकवर देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. टेरर फंडिंग आणि कॅम्प चालवण्याच्या आरोपाखाली एनआयएने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून एनआयएने या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पीएफआयशी संबंधित काही धागेदोरे हाती लागले आहेत. एनआयएला मोठ्या प्रमाणात पीएफआय आणि त्याच्याशी संबंधित लोकांच्या संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली होती. त्यावरून मुंबईतील काळा चौकी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यावरून औरंगाबाद एटीएसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख व नांदेड एटीएसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक डी. एस. शिंदे यांच्या पथकाने गुरूवारी सकाळी परभणीतून पहाटे पाचच्या सुमारास पीएफआयच्या चार पदाधिकार्‍यांना वेगवेगळ्या भागातून अटक केली.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT