Latest

Shivshakti Parikrama : पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज जामखेडला

अमृता चौगुले

जामखेड(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा आज (दि.9) जामखेड तालुक्यात येणार आहे. आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तालुका भाजपने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. श्रावण महिन्याचे औचित्य साधून शिव आणि शक्तीचे दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे चार सप्टेंबरपासून राज्याचा दौर्‍यावर आहेत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या देवस्थानांचे त्या दर्शन घेत आहेत. त्याबरोबर या प्रवासात त्या ठिकठिकाणच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. शिव-शक्ती परिक्रमा यात्रेमुळे भाजपा व मुंडे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. सध्या ही यात्रा अंतिम टप्प्यात आहे. यात्रेचा समारोप 11 सप्टेंबरला परळी येथील ज्योतिर्लिंग मंदिरात होणार आहे.

पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी जामखेड शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. सकाळी 11 च्या सुमारास त्याचे आगमन होणार आहे. करमाळा चौक व खर्डा चौकात भाजपकडून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. आमदार शिंदे यांच्या वतीने खर्डा चौकात मुंडे यांचे भव्य दिव्य स्वागत केले जाणार आहे. यासाठी भव्य असा 22 फुटी फुलांचा हार तयार करण्यात आला आहे. तसेच, दहा जेसीबी मशिनद्वारे फुलांची उधळण केली जाणार आहे.

खर्डा भाजप व मुंडे समर्थकांकडून लोणी फाटा ते सीताराम गड अशी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सीताराम गडावर दर्शन घेतल्यानंतर खर्डा बसस्थानक परिसरात नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्या हस्ते नागोबाचीवाडी येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे प्रवेशद्वाराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर त्या गितेबाबा समाधीचे दर्शन घेणार आहेत. येथे त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे. त्यानंतर त्या भाजपा नेते नानासाहेब गोपाळघरे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. या ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर त्या पाटोद्याकडे रवाना होणार आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT