Latest

पणजी : साखळी पालिकेवर भाजप समर्थक गटाकडून काँग्रेस समर्थक गटाचा धुव्वा

निलेश पोतदार

पणजी : पुढारी वृत्तसेवा साखळी पालिकेवर भारतीय जनता पक्ष समर्थक गटाने काँग्रेस समर्थक गटाचा पूर्णपणे धुव्वा उडवला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप समर्थक गटाने काँग्रेसचे दोन वेळचे विधानसभा उमेदवार व टुगेदर फॉर साखळी या काँग्रेस समर्थक गटाचे नेते धर्मेश सगलानी यांच्या गटाचा पूर्णपणे धुव्वा उडवला असून, मतदान झालेल्या १० पैकी १० जागा मिळवल्या आहेत.

यापूर्वी या गटाचे प्रवीण ब्लेगन बिनविरोध निवडून आले होते. तसेच भाजप गटाचे रियाझ खान हेही बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे काँग्रेस गटाचा एकमेव नगरसेवक १२ सदस्यीय साखळी पालिकेत दिसणार आहे. दहा प्रभागासाठी झालेला मतदानामध्ये दहाच्या दहा जागा भाजप समर्थक तथा मुख्यमंत्री समर्थक घाटाला मिळाल्या आहेत. फोंडा पालिकेत भाजप गटाला बहुमत मिळणार आहे. तेथेही कांग्रेसचा धुव्वा उडाला असून, मगो समर्थक गटाला काही जागा मिळाल्या आहेत.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT