Latest

Ashadhi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जेजुरीहुन वाल्हेकडे मार्गस्थ, पाहा फोटो

अमृता चौगुले

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या सुवर्णनगरीतून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हेकडे पहाटे ६ वाजता मार्गस्थ झाला. सकाळी ८ वाजता हा सोहळा दौंडज खिंडीत न्याहारीसाठी विसावला. परिसरातील शेतकऱ्यांनी दिलेल्या भाजी-भाकरीची न्याहारी उरकून हा सोहळा पुढे मार्गस्थ झाला. या सोहळ्यात जेजुरीपासून माजी शिक्षणमंत्री व मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा माजी मंत्री वर्षा गायकवाड सहभागी झाल्या.

त्यांनी दिंडीमध्ये सहभाग घेवून भजन, ओव्या गात, फेर धरून फुगड्या खेळून वारीचा आनंद लुटला. आमच्या घरात वारीची परंपरा असून ही वारी आनंदाची, रूढी, परंपरा, संस्कृती जपणारा आहे असे सांगून आळंदी येथे पोलिसांनी वारकरी बांधवांवर केलेलं लाठीचार्जचा त्यांनी निषेध केला. या वारीत भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे सहभागी होऊन अभंग गात वारी केली.

हे ही वाचा : 

SCROLL FOR NEXT