Latest

NED vs PAK : रिझावन-शकिलच्या खेळीन पाकिस्तानला तारलं; नेदरलॅन्ड्सला २८७ धावांचे आव्हान

Shambhuraj Pachindre

पुढारी ऑनलाईन डेस्क :  पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात नेदरलॅन्ड्ने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरूवात खराब झाली. नेदरलॅन्ड्सच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या आघाडी फळीला ३८ धावांवर गुंडाळले. यानंतर मैदानावर फलंदाजीसाठी आलेल्या रिझवान-शकिल जोडीने चौथ्या विकेटसाठी १२० धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरला. (NED vs PAK)

पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने ७५ बॉलमध्ये ६८ धावांची खेळी केली. यामध्ये त्याने ८ चौकार लगावले. तर शकिलने आक्रमक खेळी करत ५२ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. यामध्ये त्याने ९ चौकार आणि १ षटकार लगावला. यांच्यासह मोहम्मद नवाजने ३९ आणि शादाब खानने ३२ धावांचे योगदान दिले. हारिस रौफने १६, इमाम उल हकने १५, शाहीन आफ्रिदीने नाबाद १३ आणि फखर जमानने १२ धावा केल्या. इफ्तिखार अहमदला केवळ नऊ धावा तर बाबर आझमला केवळ पाच धावा करता आल्या. हसन अलीला खातेही उघडता आले नाही.  (NED vs PAK)

नेदरलॅन्ड्सकडून बास डी लीडेने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर कॉलिन अकरमनला दोन विकेट घेतल्या. तर, आर्यन दत्त, लोगन व्हॅन बीक आणि पॉल व्हॅन मीकरेन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT