Latest

Pakistan vs Afghanistan : इमाम-उल-हकचा पाक फलंदाजांना सल्ला; म्हणाला, ‘षटकार मारायचे असतील तर…’

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा फलंदाज इमाम-उल-हकने पाकिस्तानी फलंदाजांना षटकार मारायचे असतील तर अधिक प्रथिने खाण्याची गरज आहे, असा सल्ला दिला आहे. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तो चांगलाच ट्रोल झाला आहे.

संबंधित बातम्या : 

इमाम-उल-हकने सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी पॉवरप्लेदरम्यान षटकार मारण्यासाठी अधिक प्रथिने खाण्याचा सल्ला पाकिस्तानच्या फलंदाजांना दिला. इमाम-उल-हक सामनापूर्व पत्रकार परिषदेत बोलत होता. यावेळी त्याने भारतात चालू असलेल्या आयसीसी विश्वचषक २०२३ मध्ये तितकेसे प्रभावी नसल्याबद्दल आपल्या गोलंदाजांचे समर्थन केले आहे.

पॉवरप्ले दरम्यान पाकिस्तानी फलंदाज शांत का होते? अनलॉक करण्याची काही मानसिकता होती का? असे सवाल माध्यमांनी विचारले असता, इमामने आहारा संबंधी सल्ला दिला. "कदाचित आपल्याला जास्त प्रथिने खाण्याची गरज आहे. आपण जेवढे प्रोटीन पाहिजे तितके खात नाही. आपण षटकार किंवा चौकार का मारत नाही हे आपल्याला कळत नाही. आपण संघासाठी काय करत आहोत हेच कळत नाही," असे तो म्हणाला. उपांत्य फेरीपूर्वी त्यांचे पाच सामने बाकी आहेत आणि संघासाठी फक्त विजय महत्त्वाचा आहे, असेही त्याने सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT