Latest

Pakistan Crisis : पाकिस्तानला चीनकडून पुन्हा नवीन कर्ज

अमृता चौगुले

इस्लामाबाद : पाकिस्तानला चीन पुन्हा एकदा 1.3 अब्ज डॉलर्सचे कर्ज देत आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री इसहाक दार यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. आम्ही कंगाल नाही आणि पुढेही कंगाल होणार नाही, असेही दार म्हणाले. (Pakistan Crisis)

चीनच्या नव्या कर्जाने पाकिस्तानचा घसरत चाललेला विदेशी चलनसाठा पुन्हा वाढेल. चीन हे पैसे 3 हप्त्यांमध्ये देणार आहे. 0.5 अब्ज डॉलरचा पहिला टप्पा पाकच्या सेंट्रल बँकेत आला आहे, अशी माहिती दार यांनी दिली. (Pakistan Crisis)

फक्त 3 आठवड्यांच्या आयातीला पुरेल एवढा विदेशी चलन साठा पाकिस्तानकडे शिल्लक आहे. त्यात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) मिळणार्‍या कर्जाच्या पहिल्या हप्त्याने आणखी वाढ होईल, अशी आशा आहे, असे दार म्हणाले. पाकिस्तानला आर्थिक दरी भरून काढण्यासाठी 5 अब्ज डॉलरच्या परकीय चलनाची आवश्यकता आहे. आयएमएफसोबत पुढील आठवड्यापर्यंत करारावर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा दार यांना आहे.

अधिक वाचा :

SCROLL FOR NEXT