पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचे महानायक अतिमात बच्चन यांना प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शुटिंगवेळी झालेल्या अपघातावेळी दुखापत झाली आहे. त्यांनी आपल्या 'ब्लॉग'वर शुटिंगवेळी अपघातानंतर नेमकं काय घडलं, याची माहिती दिली आहे. तसेच त्यांना होणार्या त्रासही त्यांनी नमूद केला आहे. ( Amitabh Bachchan, blog post )
अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, "हैदराबाद येथे प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शुटिंग सुरु होते. या चित्रपटातील ॲक्शन शॉट घेताना मला दुखापत झाली. बरगडी कूर्चा तुटला आणि उजव्या बरगडीच्या पिंजर्यात स्नायू फाटले. या अपघातानंतर शुटिंग रद्द केले आहे. हैदराबादच्या एआयजी हॉस्पिटलमध्ये मी दाखल झाला. डॉक्टरांचा सल्ला घेतला. सीटी स्कॅन केले. यानंतर मी पुन्हा घरी आलो. मला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. माझ्यावर औषधोपचार सुरु आहेत. हालचान करताना आणि श्वास घेताना त्रास होतीय. मला पूर्ण बरे होण्यास काही आठवडे लागतील."
शुटिंग स्थगित करण्यात आले आहे. मी माझ्या जलसा या घरी विश्रांती घेत आहे. आवश्यक कामांसाठी मी काही वेळ मोबाईल फोन वापरतो. आता पूर्णवेळ विश्रांती सुरु आहे. आज सायंकाळी मी जलसा गेटवर माझ्या हितचिंतकांना भेटू शकणार नाही. बाकी सर्व ठीक आहे, असेही अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे.
हेही वाचा :