Latest

Nitin Desai : नितीन देसाईंना मनात सलत होती ‘ती’ गोष्ट, कसा उभारला होता ND Studio?

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नितीन देसाई यांनी २००५ मध्ये कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ उभारला होता. तब्बल ४३ एकर क्षेत्रात हा स्टुडिओ उभारण्यात आला होता. यामध्ये २५ हजार वर्ग फूट इनडोअर फ्लोर होता.  (Nitin Desai ) सोबत प्रॉप्स चेंबर, रॉयल पॅलेस, किल्ले, सिटी टाऊन स्क्वॉयर, गावाच्या लोकेशनचे सेट होते. या स्टुडिओची उभारणी कशी झाली होती, माहितीये का? (Nitin Desai )

ब्रॅड पिटच्या चित्रपटामध्ये काम करायला न मिळाल्याने नितीन देसाई यांनी ND स्टुडिओ उभारला होता. चार महिन्यांपूर्वी भास्करला दिलेल्या मुलाखतीत नितीन यांनी स्टुडिओचा प्रसंग सांगितला होता. नितीन यांनी म्हटले होते. 'अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक ओलिवर स्टोनने मला काम करण्यासाठी ऑफर दिले होते. त्यांच्यासोबत मी ९ दिवस लडाख, उदयपूर, महाराष्ट्र यासारख्या अनेक शहरांमध्ये फिरलो. त्यांना ब्रॅड पिटसोबत ॲलेक्जेंडर-द ग्रेट चित्रपट आणायचा होता. या चित्रपटाचा काही हिस्सा इंडियामध्ये शूट करायचा होता. आम्ही प्रत्येक गोष्टीवर चर्चा केली. पण, जेव्हा मी त्यांना एका स्टुडिओमध्ये घेऊन गेलो, तेव्हा ते थोडे निराश झाले होते.'

'चित्रपटाचे बजेट ६५० कोटी रुपये होते. ज्याप्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हवं होतं, तसे त्यांना मिळाले नाही. तेव्हा मला वाटले की, असा स्टुडिओ उभारला पाहिजे, जो इंटरनॅशनल लोकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल. ही गोष्ट लक्षात ठेवून अनेक ठिकाणे पाहिल्यानंतर मला कर्जतमध्ये ND स्टुडिओ उभारण्याची संधी मिळाली.'

याच स्टुडिओमध्ये भारताचे पहिले तीम पार्क तयार झालं होतं. स्टुडिओत आमिर खानचा पहिला चित्रपट मंगल पांडे – द रायझिंगचे शूटिंग झाले होते.

मधुर भंडारकर यांचा ट्रॅफिक सिग्नल, आशुतोष गोवारीकर यांचा जोधा अकबर या चित्रपटाचे शूट याच स्टुडिओच्या सेटवर झाले होते. तसेच सलमानचा चित्रपट प्रेम रतन धन पायो, किक, बॉडीगार्ड, वॉन्डेटचे शूट झाले होते.

SCROLL FOR NEXT