Latest

OTT Platforms Blocked: माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाीन डेस्क : ऑनलाईन माध्यमांवरील अश्लिल आणि असभ्य मजकूर आणि माहितीबद्दल सातत्याने इशारा दिल्यानंतर आज (दि.१४)  माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने मोठी कारवाई केली. मंत्रायलाने देशभरातील 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या संदर्भातील वृत्त 'ANI' वृत्तसंस्थेने दिले आहे. (OTT Platforms Blocked)

ओटीटी वेबसाईटबरोबरच देशभरात १९ वेबसाइट, १० ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हँडलदेखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (OTT Platforms Blocked)

या विविध ऑनलाईन, डिजीटल माध्यमांवरील मजकूर IT कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायदा, 1986 या कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (OTT Platforms Blocked)

'या' OTT ॲप्सवर बंदी घातली आहे

सरकारने ब्लॉक केलेल्या OTT प्लॅटफॉर्ममध्ये Dreams Films, Woovi, Yesma, Uncut Adda, Tri Flix, X Prime, Neon Includes Fugi, ChikuFlix आणि प्राइम प्ले यांचा समावेश आहे.

हे ही वाचा:

SCROLL FOR NEXT