Latest

‘गली गली में शोर है, खोके सरकार चोर है’: विरोधकांची विधानभवन परिसरात घोषणाबाजी

अविनाश सुतार

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिंदे-फडणवीस राज्य सरकारचा निषेध केला. ईडी सरकारचा धिक्कार असो… राजीनामा द्या.. राजीनामा द्या… मुख्यमंत्री राजीनामा द्या… विदर्भातील संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे… धानाला बोनस मिळालाच पाहिजे… ईडी सरकार हाय हाय… आदी मागण्यांच्या घोषणांनी विरोधकांनी सभागृह परिसर दणाणून सोडला.

बोम्मई सरकार हायहाय, कर्नाटक सरकारचा निषेध असो, राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ, अशा घोषणा देऊन अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, नाना पटोले, आदित्य ठाकरे, रोहित पवार, सुनील राऊत, भास्कर जाधव, विकास ठाकरे, हसन मुश्रीफ आदी सहभागी झाले होते.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT