Latest

पुणे : वरकुटे बुद्रुक येथे अफुची शेती; दोघांवर गुन्हा दाखल

अमृता चौगुले

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक याठिकाणी अफु या अंमली पदार्थाची काही झाडे आंतरपिक पद्धतीने लागवड करण्यात आली होती. इंदापूर पोलीसांनी या ठिकाणी कारवाई करत २ लाख ११ हजार ३०० रूपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

याबाबत इंदापूर पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार सुरेंद्र जंयवत वाघ यांच्या फिर्यादीवरुन पांडुरंग नामदेव कुंभार व नवनाथ गणपत शिंदे (दोघे रा. वरकुटे बुद्रुक, ता. इंदापुर) यांच्याविरूद्ध अंमली औषधिद्रव्य व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवारी (दि. २) पांडुरंग नामदेव कुंभार (रा. वरकुटे बुद्रुक) यांचे जमीन गट नंबर 24 व नवनाथ गणपत शिंदे यांचे गट नं.२८/२ मधील शेतातील विहीरीच्या कडेला ही अफुची झाडे भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपिक म्हणून लागवड केल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. अफुचे (खसखस) ओल्या झाडाचे व बोंडाचे एकुण वजन 32 किलोग्रॅम असून, अफुच्या बोंडासह झाडांची एकुण किंमत अंदाजे 2 लाख 11 हजार 300 रूपये आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील करत आहेत.

हे वाचलत का?

SCROLL FOR NEXT