इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानातील लाहोर येथे अलीकडेच खलिस्तानवादी परमजित सिंग पंजवार याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हत्येमागे भारतातील रॉ या गुप्तचर संघटनेचा हात असल्याचा आरोप दस्तुरखुद्द पाक लष्करातील एका निवृत्त अधिकार्याने केला आहे. पाकिस्तानातील लष्कर, आयएसआय तसेच पोलिसांच्या क्षमतेबाबतही या अधिकार्याने अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली आहेत. (Raw Operations In Pakistan)
या अधिकार्याने पाकिस्तानी लष्कर तसेच आयएसआय मिळून खलिस्तानी दहशतवाद्यांना शस्त्रे, निधीसह अनेक प्रकारची रसद पुरवत असल्याचेही या ओघात उघड केले आहे. (Raw Operations In Pakistan)
भारतात ड्रग्ज तसेच नकली नोटा पाठविणार्यांना सुरक्षा देण्याचा पाकिस्तानी लष्कर आपल्या परीने पुरेपूर प्रयत्न करते; पण 6 मे रोजी खालिस्तानी कमांडो फोर्सचा भारतातून फरार असलेला प्रमुख परमजित सिंग पंजवार याला आयएसआयची सुरक्षा असतानाही केवळ 2 हस्तकांच्या बळावर त्याची हत्या घडवून आणण्यात रॉ यशस्वी ठरली.
आयएसआयला त्याबद्दल शरम वाटली पाहिजे, अशी आगपाखडही पाक लष्करातील निवृत्त मेजर आदिल फारूक राजा यांनी केली आहे. लेफ्टनंट जनरल नदीम अंजुम आणि जनरल असीम मुनीर यांचेही हे अपयश असल्याचा ठपका आदिल यांनी ठेवला आहे.
अधिक वाचा :