पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारातील तेजीचे सत्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी सुरुवातीला कायम राहिले आहेत. जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक संकतामध्ये जोरदार खेरदी दिसून येत आहे. NSE निफ्टी 50 0.59% वर 19,345.85 वर उघडला, तर BSE सेन्सेक्स 471.75 अंकांनी 64,835.23 वर उघडला. बँक निफ्टी निर्देशांक 309.5 अंकांनी वाढून 43,627.75 वर उघडला.
आशियाई बाजारातही जोरदार खरेदी दिसून येत आहे, ज्यामध्ये जपानचा निक्केई आणि कोरियाचा कोस्पी सुमारे 3-3 टक्क्यांनी वधारत आहे. अमेरिकन फ्युचर्स मार्केटमध्ये फ्लॅट ट्रेडिंग आहे. याआधी शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स २८२ अंकांनी वाढून ६४,३६३ वर बंद झाला होता.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, वेदांता, एनटीपीसी, आयओसी, दिल्लीवेरी आणि जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीच्या शेअर्सनी आजच्या ट्रेडिंग सत्रात तेजी अनुवली तर कोल इंडिया, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल्स, अॅक्सिस बँक आणि JSW स्टील यांनी NSE निफ्टी 50 वर वाढ केली.
जागतिक भांडवली बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे शुक्रवारी (दि.३) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निप्टी तेजीसह स्थिरावले होते. सेन्सेक्स २८२.८८ अंकांनी वधारुन ६४.३६३.७८ पातळीवर बंद झघला होता. तर निप्टीनेही ९७.३५ अंशांनी भर घातल १९२३०.६० पातळीवर स्थिरावला होता. मजबूत जागतिक संकेत, देशांतर्गत कंपन्यांच्या समाधानकारक कमाईमुळे वाढलेला गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास, खनिज तेलाच्या किंमतीतील घसरणीमुळे शेअर बाजारात उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :