Latest

राधानगरी : मोटरसायकलींची समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार, दोन गंभीर

मोनिका क्षीरसागर

 गुडाळ,पुढारी वृत्तसेवा : आणाजे गावातील वळणावर मोटार सायकलस्वाराने मारुतीव्हॅनला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत समोरून येणाऱ्या दुसऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार अवधूत पांडुरंग सुतार (वय २८, रा. मुदाळ ता. भुदरगड) हा तरुण जागीच ठार झाला. त्याचे वडील पांडुरंग महिपती सुतार (वय ६४), धनाजी पांडुरंग फाले (वय २८ रा. बोंद्रेनगर) हे गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी (दि. ५ जून )दुपारी हा अपघात घडला.

 मुदाळ येथील हुतात्मा स्वामी वारके सूतगिरणीत वॉचमन असलेला अवधूत वडिलांसोबत राधानगरी तालुक्यातील धामोड येथे  औषध घेण्यासाठी गेला होता. दुपारी चारच्या दरम्यान आणाजे कडून खिंडी व्हरवडे मार्गे ते मुदाळतिट्याकडे निघाले होते. याच दरम्यान बोंद्रेनगर मधील रहिवासी असलेला मात्र फोंडाघाट येथे वास्तव्यास असलेला धनाजी फाले मोटारसायकलने (क्र. एम एच ०७ एम ६३६८ )  भरधाव वेगाने खिंडी व्हरवडेकडून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. त्याने सुतार पिता-पुत्रांच्या मोटारसायकलला (एम. एच. ०९ इ ए १३९० ) जोरदार धडक दिली.

अपघातानंतर दोन्ही दुचाकींची तिघेही रस्त्यावर फेकले गेले. आणाजे येथील विश्वास पाटील यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिका आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. तेली यांनी अवधूत यास मृत झाल्याचे घोषित केले. उर्वरित जखमींना सीपीआरमध्‍ये दाखल केले आहे. राधानगरीच्या पोलीस उपनिरीक्षक अनुराधा पाटील यांनी सहकाऱ्यासह  पंचनामा केला.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT