Latest

पुणे : सराईत गुन्हेगाराकडून पिस्तुलासह दोन जिवंत काडतुसे जप्त

अमृता चौगुले

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती शहर पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या सलमान अबू थोटे (वय २६, रा. घर नं. ५, पाचवण, निजामपुरा, भिवंडी, ठाणे, सध्या रा. फुरसुंगी, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांनी बेकायदा पिस्तुल बाळगणाऱयांवर कारवाईसाठी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कुलदीप संकपाळ हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना रेल्वे स्थानकाजवळ मोकळ्या जागेत एक व्यक्ति गावठी पिस्तुल घेवून येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना ही माहिती दिली. त्यानुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तेथे सापळा रचला.

यावेळी एक व्यक्ति पोलिसांची नजर चुकवून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्याला पकडले. त्याच्याकडे नावाची चौकशी कऱण्यात आली. अंगझडतीत त्याच्याकडे २५ हजार रुपयांचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे मिळाली. थोटे हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी महाडिक, संकपाळ यांच्यासह उपनिरीक्षक युवराज घोडके, अंमलदार अनिल सातपुते, रामचंद्र शिंदे, गौरव ठोंबरे, अभिजित कांबळे, दशरथ कोळेकर, तुषार चव्हाण, बंडू कोठे, दशरथ इंगोले आदींच्या पथकाने केली.

SCROLL FOR NEXT