Latest

…म्हणून मनालीमध्ये पर्यटकांना ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या दिवशी रस्त्यावर काढावी लागू शकते रात्र

अमृता चौगुले

पुढारी ऑनलाईन: ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले शहर मनालीमध्ये पर्यटकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असताना पर्यटननगरीतील यंत्रणा सुस्त असल्याचे दिसून येत आहे. व्यवस्था अशीच राहिल्यास पर्यटकांना हॉटेलपर्यंत पोहोचणे कठीण होऊन त्यांना रात्र गाडीतच काढावी लागू शकते. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचीरात्र अजून यायची बाकी आहे. पण त्याआधीच मनालीचे रस्ते जाम होऊ लागले आहेत. उझी खोऱ्यातील लोकांना सर्वाधिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मनालीहून सोलंगनाला जाणारे पर्यटक अनेक तास वाहतूक कोंडीत अडकले आहेत. दररोज सकाळी सोलंगनाला ते नेहरूकुंड अशी पाच किमी लांब वाहतूक कोंडीची रांग लागत आहे.

सरकारने सोलंगनालात सुमारे तीन हजार वाहने उभी करण्याची व्यवस्था केली असली तरी प्रशासनाच्या अनागोंदीमुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे. मात्र, अटल बोगदा ओलांडल्यानंतर सोलंगनाला येथील ही समस्या कमी होते. पण हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार ख्रिसमसच्या काळात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पर्यटकांना सोलंगनालाच्या पलीकडे जाता येत नाही. स्की हिमालय रोपवेच्या व्यवस्थापक निर्मला कपूर यांनी सांगितले की, मनाली आणि सोलंगनाला दरम्यान अनेक तास वाहतूक कोंडी असते, त्यामुळे पर्यटकांसह ग्रामस्थांना ये-जा करताना अडचणी येत आहेत.

हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश ठाकूर यांनी सांगितले की, ख्रिसमसच्या दिवशी मनालीमध्ये पर्यटकांचा ओघ असेल. ते म्हणाले की, सोलंगनालातील वाहतूक कोंडीची समस्या सर्वांनाच सतावत आहे. ख्रिसमस आणि नववर्षानिमित्त वाहतूक व्यवस्था कडेकोट करावी, त्यामुळे पर्यटकांना या काळात फिरण्याचा आनंद घेता येईल, अशी विनंती त्यांनी प्रशासनाला केली.

डीएसपी मनाली संजीव कुमार म्हणाले की, वाहतूक व्यवस्था मजबूत केली जात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी सोलंगनालासह गुलाबा, हमटा या दिशेनेही पर्यटकांना पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT