Latest

omicron variant: नायजेरियातून पिंपरी-चिंचवडमध्ये आलेले तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह

रणजित गायकवाड

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : omicron variant : आफ्रिकेतील नायजेरिया देशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या दोघे जण आणि त्यांच्या संपर्कात आलेला एक जण असे तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) आढळून आले आहेत. त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी कॅम्पातील नवीन जिजामाता रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना होम आयसोलेट करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सोमवारी (दि. 1) दिली.

राज्य शासनाच्या सूचनेवरून परदेशामधून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. नायजेरियातून दोघे जण गुरूवारी (दि.25) पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यांची कोरोना चाचणी केली असता सोमवार (दि.29) त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. (omicron variant)

तसेच, त्यांच्या संपर्कातील एका व्यक्तीचा अहवाल मंगळवार (दि.30) कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या नागरिकांना ओमायक्रॉन या कोरोनाच्या नवीन लागण झाली आहे का हे तपासणीसाठी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने जिनोम सिकव्हेंसिंगकरिता पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्या तिघांना पालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे संपर्कामधील नागरिकांना होम आयसोलेट केले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. (omicron variant)

आफ्रिका व युरोपीय देशांमध्ये ओमायक्रॉन कोरोनाच्या नवा विषाणू आढळून येत असून नायजेरिया या देशामध्ये तो विषाणू अद्याप आढळून आलेला नाही, असे डॉ. गोफणे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, परदेशातून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या नागरिकांनी तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. (omicron variant)

SCROLL FOR NEXT