नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क
देशात ओमायक्रॉन (Omicron) रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चिंता व्यक्त केली जाच आहे. देशात एका दिवसात ओमायक्रॉन रुग्णसंख्येत १८० ने भर पडली आहे. यामुळे एकूण रुग्णसंख्या ९६१ वर पोहोचली आहे. दिल्लीत सर्वांधिक २६३ रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ११५ कोविड १९ नमुन्यांच्या विश्लेषणात ओमायक्रॉनचे प्रमाण ४६ टक्के आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. ट्रॅव्हल हिस्ट्री नसलेल्या लोकांना ओमायक्रॉनची लागण होत आहे. याचा अर्थ असा की ओमायक्रॉन हळूहळू पसरू लागला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीतील रुग्णालयांत २०० रुग्ण उपचार घेत आहेत. यात शहरातील १०२ आणि बाहेरील ९८ रुग्णांचा समावेश आहे. २०० पैकी ११५ रुग्णांनी कसलीही लक्षणे नाहीत. पण खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आल्याचे जैन यांनी म्हटले आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील आतापर्यंत आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या (Omicron) ९६१ रुग्णांपैकी ३२० रुग्ण बरे झाले आहेत. दिल्लीत २६३, महाराष्ट्रात २५२, गुजरात ९७, राजस्थान ६९, केरळमध्ये ५५ रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्यादेखील वाढली आहे. बुधवारी कोरोनाचे नवे १३ हजार १५४ रुग्ण आढळून आले.
हे ही वाचा :