ओमायक्रॉन ठरणार कोरोना महामारीचा अंत!

ओमायक्रॉन ठरणार कोरोना महामारीचा अंत!
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच कोरोनाच्या अंताचे निमित्त ठरेल. ब्रिटिश मेडिकल कौन्सिलचे माजी शास्त्रज्ञ डॉ. राम एस. उपाध्याय यांनी याबाबत माहिती देत ओमायक्रॉनमुळे रोगप्रतिबंधक क्षमता विकसित होत असल्याचा दावा बुधवारी केला. ओमायक्रॉन व्हेरियंट हा डेल्टाप्रमाणे फुफ्फुसांत थेट शिरत नाही. तो श्‍वासनलिकेत मुक्‍काम ठोकून आपली संख्या वाढवतो. ओमायक्रॉन फुफ्फुसापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याचा वेग 10 पट कमी झालेला असतो. त्यामुळे ओमायक्रॉन बाधिताला ऑक्सिजनची गरज पडत नाही, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटने ओमायक्रॉन बाधितांवर केलेल्या एका संशोधनात या रुग्णांमध्ये कोरोनाच्या कुठल्याही व्हेरियंटशी लढण्याची अधिक क्षमता विकसित झाल्याचे आढळून आले. बाधितांमध्ये ओमायक्रॉनशी लढण्याची क्षमता 14 पटींनी, तर डेल्टाशी लढण्याची क्षमता 4.4 पटींनी वाढलेली होती. लसीचे दोन्ही डोस घेऊनही ओमायक्रॉनची बाधा झालेल्यांमध्ये दोन्ही डोस घेतलेले नाहीत, अशा ओमायक्रॉन बाधितांच्या तुलनेत अधिक रोगप्रतिबंधक क्षमता विकसित झाल्याचेही यातून समोर आले.अमेरिकेतील टेक्सास येथील 'कोविडआरएक्सएक्सचेंज'चे डॉ. शशांक हेडा यांनी दोन्ही डोस घेणे त्यामुळेच आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

डॉ. उपाध्याय यांनी सांगितले, माणसाच्या श्‍वासनलिकेत 'म्युकोसल इम्युन सिस्टीम' (एक रोगप्रतिबंधक यंत्रणा) असते. त्यातच एक अँटिबॉडी (प्रतिपिंड) तयार होते. या अँटिबॉडीला 'इम्युनोग्लोबुलिन आयजीए' म्हणतात. ओमायक्रॉन श्‍वासनलिकेत आपली संख्या वाढवत असतो, तेव्हा तेथे आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या अँटिबॉडीज कार्यरत होतात. ओमायक्रॉन काही करेल, त्याआधीच अँटिबॉडी त्याचा खात्मा करू लागतात. ओमायक्रॉनची संक्रमणक्षमता म्हणजेच पसरण्याचा वेग फार जास्त आहे. पण त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. जेवढी अधिक लागण त्याची होईल, तेवढा कोरोनाचा धोका कमी होत जाईल.

रोगप्रतिबंधक क्षमता अधिक टिकते

विषाणूची लागण झाल्यानंतर शरीरात तयार होणारी रोगप्रतिबंधक क्षमता ही लस घेतल्याने तयार होणार्‍या रोगप्रतिबंधक क्षमतेपेक्षा अधिक काळ शरीरात टिकून राहाते. त्यामुळे जितका जास्त ओमायक्रॉन पसरेल, तितकी लवकर कोरोना ही महामारी संपुष्टात येईल, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ओमायक्रॉनबाधित, भविष्यात सुरक्षित

ओमायक्रॉनची लागण झाल्यानंतर तयार झालेल्या अँटिबॉडीज डेल्टा व्हेरियंटची पुनर्लागण होण्यापासून आपला बचाव करतात, असे 'आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या संशोधनातून निष्पन्‍न झाले आहे. ओमायक्रॉनची बाधा झालेली व्यक्‍ती भविष्यात कोरोनापासून सुरक्षित राहणार आहे, याचाच हा पुरावा आहे, असे टेक्सास (अमेरिका) येथील डॉ. हेडा यांनी नमूद केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news