Latest

Sankashti Chaturthi 2022 : आज संकष्टी चतुर्थी; जाणून घ्या चंद्रोदय किती वाजता?

सोनाली जाधव

मुंबई; पुढारी ऑनलाईन :  गणपती बाप्पांच्या पूजनाने शुभ कार्याची सुरुवात केली जाते. प्रत्येक महिन्यात दोनवेळा संकष्टी चतुर्थी (Sankashti Chaturthi 2022) येते. आज गुरुवार (दि. १३) रोजी गणपती बाप्पाची संकष्‍टी असून, चंद्रोदय ८.४४ मिनिटांनी आहे.

आजच्या दिवशी गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या जातात. गणपतीला मोदक प्रिय असल्याने गणेशभक्‍त मोदकांचा नैवेद्यात आवर्जून समावेश करतात. संकष्टी निमित्त दिवसभर उपवास केला जातो. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला आणि गणपतीला नैवेद्य दाखवल्‍यानंतर उपवास सोडला जातो. आज रात्री ८.४५ मिनिटांनी चंद्रोदय आहे.

Sankashti Chaturthi 2022 : श्री गणेशाला का वाहतात दुर्वा?

ऋषी मुनी आणि देवता यांना अनलासूर नावाच्या राक्षसाने त्रास द्यायला सुरुवात केली होती. अनल अर्थात अग्नी. देवतांच्या विनंतीनंतर गणेशजींनी त्या असूराला गिळून टाकले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा ८८ सहस्त्र मुनींनी प्रत्येकी २१ अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ जुडी गणेशाला खाण्यास दिल्या.

त्यावेळी अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली. त्यावेळी, यापुढे मला दुर्वाची जुडी अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वाची जुडी वाहिली जाते. अशी एक आख्यायिका सांगितली जाते.

दुर्वा याचा अर्थच प्राण

दुर्वा याचा अर्थच प्राण किवा जीव असा आहे. त्या पवित्रतेचे प्रतीक आहेत. दुर्वा अनेक मुळांतून उगवतात. दोन पानी दुर्वा माणसाच्या सुखदुःखाचे द्वंद परमात्म्याकडे पोहोचवितात. तीन पानी दुर्वा यज्ञात वापरल्या जातात. कारण त्या भौतिक, कर्म आणि माया यांचे प्रतीक असून मनुष्यातील या तिन्ही दोषांचे यज्ञात दुर्वा भस्म केल्यामुळे भस्म होते अशी समजूत आहे. पाचपानी दुर्वा या पंचप्राण स्वरूप आहेत. गणेशाला या तिन्ही प्रकारच्या दुर्वाची जुडीच्या स्वरूपात वाहिल्या जातात.

शुक्लपक्ष माघ चतुर्थीला (विनायक चतुर्थी) गणपतीचा जन्म दिवस असतो. श्री गणेश जयंती म्हणून सगळीकडे गणपतीचा जन्म दिवस माघ शुक्लपक्ष चतुर्थीला गणपतीचा जन्म उत्सव साजरा करतात.

हेही वाचलंत का?  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT