पुढारी ऑनलाईन डेस्क : "शिवसेनेतून निवडून आले होते ते शिंदे गटातील १३ खासदार पुन्हा निवडून येणार नाहीत. त्या सर्व जागांवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे खासदार निवडून येतील. ठाकरे गटाचे १९ खासदार विजयी होतील," असा विश्वास ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. आज (दि.२४ ) माध्यमांशी ते बोलत होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता. त्यांना कोणती ऑफर होती त्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी शरद पवार यांनाही याबाबत माहिती दिली होती. त्यांनी कोणाची नावे घ्यावी, त्यांना कोण-कोण भेटले याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. त्यांनी प्रस्ताव नाकारल्यावर त्यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना तुरूंगात टाकलं. जयंत पाटील यांच्यावरही तसाच दबाव होता. विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर भाजपचा दबाव आहे. काही आमदारांना घेवून आमच्याकडे या नाहीतर ईडी येईल, असा दबाव आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
मोदी सरकारकडून इतिहास बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्या संसद भवनाची देशाला गरज होती का? जुनी इमारत अजून १०० वर्ष चालली असती. नावाच्या पाट्या लावण्यासाठी नव्या संसद भवनाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी पंदप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. देशाच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना संसदेच्या उद्घाटनासाठी का डावलण्यात आलं? पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघेही एकत्र कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात. पण राष्ट्रपती महिलेची आठवण का झाली नाही. राष्ट्रपतींना डावलल्याने या सोहळ्यावरती काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष बहिष्कार टाकणार आहेत, असेही राऊत यांनी सांगितले.
हेही वाचा :