Latest

देवेंद्र फडणवीस यांना केवळ चाैकशीसाठी नोटीस : दिलीप वळसे-पाटील

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भातील गोपनीय अहवालाची माहिती लीक झाल्याप्रकरणी ५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय डेटा बाहेर कसा आला, याबाबत केवळ चौकशी करण्यासाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ६ वेळी नोटीस पाठविण्यात आलेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही, त्‍यामुळे भाजपने याप्रकरणी एवढा कांगावा करण्‍याची गरज नही, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज स्‍पष्‍ट केले.

यावेळी गृहमंत्री वळसे – पाटील म्हणाले की,  "फडणवीस यांची केवळ चौकशी करण्‍यात आली  आहे. त्यांना आरोपी म्हणून नोटीस पाठविण्यात आलेली नाही. चौकशी कऱण्यात काही गैर नाही. त्यामुळे भाजपला यावरून दंगा करण्याची गरज नाही. कोणती माहिती द्यायची, याचा अधिकार फडणवीस यांना आहे".

एसआयटीचा डेटा कसा गेला, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी ५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर २४ साक्षीदारांचा जबाब घेण्यात आला आहे. याप्रकरणी केवळ फडणवीस यांना प्रश्नावली पाठवली होती. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब घेतला आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : चला दख्खनचा राजा जोतिबाचा महिमा ऐकूया : महिमा श्री केदारलिंगाचा…

SCROLL FOR NEXT