Latest

Nitish Kumar Resign : नितीश कुमारांचा राजीनामा, कॉंग्रेस अध्यक्ष म्‍हणाले…

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (संयुक्त) सर्वेसर्वा नितीशकुमार (Nitish Kumar Resigns) यांनी आज (दि.२८) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. गेल्या काही दिवसांपासून सुरू चर्चेला पूर्णविराम देत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) सहभागी होण्याचा निर्णय त्‍यांनी घेतला आहे. यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Nitish Kumar Resign)

Nitish Kumar Resign : आज ते खरे ठरले…

नितीशकुमार यांनी मुख्‍यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्‍यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्वीटसह व्हिडिओ शेअर करत निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की," 'आयाराम-गयाराम' सारखे असे अनेक लोक देशात आहेत. पहिले ते आणि आम्ही  एकत्र लढत होतो. मी लालूजी आणि तेजस्वी यांच्‍याशी बोललो तेव्हा त्यांनीही नितीशजी साथ साेडणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. त्यांना राहायचे असते तर ते राहिले असते; पण त्यांना जायचे आहे. आम्हाला हे आधीच माहीत होते; पण इंडिया युती अबाधित ठेवण्यासाठी आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही काही चुकीचे बोललो तर चुकीचा संदेश जाईल. लालू प्रसाद यादवजी आणि तेजस्वी यादवजी यांनी आम्हाला आधीच ही माहिती दिली होती. आज ते खरे ठरले."

आता पाचव्यांदा 'यू टर्न'

७२ वर्षीय नितीशकुमार हे बिहारच्या राजकारणातील ताकदवान नेते म्हणून ओळखले जातात. २०१३ पासून त्यांचे 'एनडीए' ते 'यूपीए' ते महागठबंधन असे चारवेळा 'यू टर्न' झाले आहेत. आधी ते 'यूपीए'मध्ये होते. त्यानंतर त्यांनी 'एनडीए'ची कास धरली. त्यानंतर तेथून बाहेर पडत महागठबंधनमध्ये प्रवेश केला. आतासुद्धा इंडिया आघाडीच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला; पण आता तेच पुन्हा 'एनडीए'त परत जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT