पुढारी ऑनलाईन डेस्क: बिहारमधील जनता दल (युनायटेड) चे सर्वेसर्वा निकीशकुमार यांनी आज ( दि.२८) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे बिहारमधील 'महायुती' सरकार संपुष्ठात आले आहे. नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपशी युती करणार असून, आजच नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. बिहारमध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे. (Nitish Kumar Bihar)
आज सायंकाळी ५ वाजता बिहारमध्ये नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. यावेळी जनता दल (संयुक्त) चे नितीशकुमार हे बिहारच्या मुख्यमंत्रीपदी शपथबद्ध होणार आहेत. भाजपचे सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. (Nitish Kumar Bihar)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेही पाटणा येथे पोहोचले आहेत. शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, आधी राजीनामा द्या, मग तुम्हाला पाठिंब्याचे पत्र दिले जाईल अशी अट भाजपने नितीश कुमार यांच्यासमोर अट ठेवली होती. नितीशकुमार यांनी राजीनामा देताच त्यांची भाजपने 'एनडीए' नेतेपदी नेमणूक केली आहे. (Nitish Kumar Bihar)