Latest

नितीन गडकरी : ‘कोल्हापूर, बेळगाव वगळून पुणे-बंगळूर महामार्ग करणार’

backup backup

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतुकीचा ताण पडला असून, त्याला पर्यायी महामार्गाची लवकरच निर्मिती करण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. त्याचबरोबर या महामार्गातून कोल्हापूर आणि बेळगाव वगळण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी बेळगावच्या रिंगरोडसह जिल्ह्यातील 12 राज्यमार्गांनाही मंजुरी दिल्याची घोषणा केली.

जिल्ह्यात 3 हजार 972 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या 238 किलोमीटर लांबीच्या राष्ट्रीय महामार्गाच्या पाच प्रकल्पांचे भूमिपूजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम सोमवारी येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.

गडकरी म्हणाले की, पुणे-बंगळूर रोडवर सध्या वाहतूक ताण वाढला आहे. यामुळे याला पर्यायी महामार्ग करण्यात येत आहे. यामधून कोल्हापूर आणि बेळगाव वगळण्यात आले असून या शहराच्या बाहेरून हा महामार्ग काढण्यात येणार आहे.

यावेळी त्यांनी बेळगावभोवती करण्यात येणार्‍या रिंगरोडसह बारा राज्यमार्गांना मंजुरी दिल्याची ही घोषणा केली. यावेळी धर्मदाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले, वनमंत्री उमेश कत्ती, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सी. सी. पाटील,खा. मंगला अंगडी, अण्णासाहेब जोल्ले, इराण्णा कडाडी, आ. अभय पाटील, अनिल बेनके आदी उपस्थित होते.

हे ही वाचलं का ?

SCROLL FOR NEXT