Latest

Nirav Modi Extradition : लंडनच्या उच्च न्यायालयाने नीरव मोदीची प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळली

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंजाब नॅशनल बँकेला गंडा घालून विदेशात फरार झालेल्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लंडनच्या उच्च न्यायालयाने गुरूवारी (दि.१५) त्याच्या प्रत्यापर्णाविरोधातील याचिका फेटाळली आहे. त्यामुळे नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेत गैरव्यवहार उघड झाल्यानंतर त्याने २०१८ मध्ये भारतातून पलायन केले होते.

भारतात मोदीविरोधात गैरव्यवहाराप्रकरणी खटला चालवण्यात आल्या नंतर, भारताने ब्रिटनकडे नीरव मोदीच्या प्रर्त्यापणाची मागणी केली होती. ब्रिटनकडून या प्रर्त्यापणास परवानगी सुद्धा मिळाली. यानंतर या प्रर्त्यापणा विरुद्ध नीरव मोदी याने तेथील सर्वोच्च न्यायालयात जाण्याची संमती मिळावण्याबाबतची याचिका लंडनच्या उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेत न्यायालयाने  मोदीची प्रर्त्यापण विरोधी याचिका फेटाळून लावली.

यावेळी सुनावनीत भारतात पाठवल्यास आत्महत्या करण्याचा धोका आहे, असा युक्तीवाद नीरव मोदीने न्यायालयात केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळली आहे. (Nirav Modi Extradition)

उच्च न्यायालयाचा निर्णय

लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसकडून देण्यात आलेल्या निर्णयानुसार, याचिकार्ते (नीरव मोदी) यांच्या सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मागणी अमान्य करत आहोत असा निर्णय दिला. नीरव मोदी हा सध्या वैंड्सवर्थ तुरूंगात कैद आहे. न्यायालयाने प्रत्यार्पणाविरोधातील याचिका फेटाळल्यानंतर नीरव मोदीकडे भारतात परतण्याशिवाय कोणताही पर्याय नाही. (Nirav Modi Extradition)

बँकेतील गैरव्यवहार उघड झाल्यानंतर भारतातून फरार

मागील महिन्यात नीरव मोदीने इंग्लंडच्या उच्च न्यायलयाच्या समक्ष सर्वोच्च न्यायालयात भारतात प्रत्यार्पण करण्याविरोधात याचिका दाखल केली होती. ही याचिका ५१ वर्षीय मोदीने मानसिक आरोग्यच्या कारणास्तव आपण दाखल करत आहोत, असा युक्तीवाद केला होता. न्यायालयाने आरोपी नीरव मोदीचा युक्तीवाद फेटाळला आहे. पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड झाल्यानंतर नीरव मोदीने भारतातून पलायन केले होते. (Nirav Modi Extradition)

हेही वाचंलत का?

SCROLL FOR NEXT