Latest

Belgaon Crime : निपाणी हादरले; अल्पवयीन शाळकरी मुलाचा दगडाने ठेचून खून

निलेश पोतदार

निपाणी : पुढारी वृत्तसेवा निपाणी येथे (१५ वर्षीय) अल्पवयीन शाळकरी मुलाचा निर्घृण खून झाल्याची घटना आज (शुक्रवार) सकाळी उघडकीस आली. शहराबाहेरील बाळूमामानगर परिसरात एका ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम परिसरात सदर शाळकरी मुलाला बोलावून त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे निपाणी व परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपाधीक्षक (डीएसपी) गोपाळकृष्ण गौडर सीपीआय बी.एस.तळवार शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक उमादेवी, हवालदार राजू दिवटे, सुदर्शन असकी, शेखर असोदे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन खून करणाऱ्या संशयीतांचा शोध चालविला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सदर खून झालेला मुलगा हा जुने संभाजीनगर येथे राहावयास होता. तो सध्या शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी निपाणी येथील एका युवकाचे अपहरण करून त्याचा भुदरगड येथे नेऊन पैशाच्या वादातून दोघा सख्ख्या मित्रांनी त्याचा खून केला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी नव्याने खुनाची घटना उघडकीस आल्याने निपाणी परिसर हादरून गेला आहे. या घटनेने पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. दरम्यान पुढील तपास डीएसपी गौडर हे करत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT