Latest

निलेश लंके हे आधुनिक श्रावण बाळ : उपमुख्यमंत्री अजित पवार

अमृता चौगुले

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : निलेश लंके आमचा लोकप्रिय आमदार असून सेवाभावाची आवड आहे. महाराष्ट्रात 288 आमदारात सर्वात जागृत आमदार म्हणून निलेश लंके यांची ओळख आहे. माजी गृहमंत्री कै. आर आर पाटील यांचा नेहमी आधुनिक गाडगेबाबा म्हणून आम्ही उल्लेख करायचो तसा आपला निलेश लंके आधुनिक श्रावण बाळ आहे. जसे त्या काळी श्रावण बाळाने काम केलं तसेच आपल्या मतदारसंघात गोरगरीब जनतेसाठी व माय माऊलीसाठी अहोराञ झटणारा दमदार आमदार  लोकनेता निलेश लंके असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

आ.नीलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोहटादेवी यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेचा शुभारंभ व महावितरणच्या आर डी एस एस योजनेअंतर्गत पारनेर-नगर मतदारसंघात सिंगल फेज डीपी व लाईनच्या कामसाठी ३३ कोटी रूपयांचा निधी मंजुर कामाचे त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते करण्यात आले.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

संबंधित बातम्या :

पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, लोकप्रिय आमदार निलेश लंके दरवर्षी महिलांना देवदर्शनाची सोय करत असतो. ही सेवाभावाची भावना मोठा देवीचा आशीर्वाद त्याला लोकसवेचे कार्य करण्यास बळ देत असतात. चार वर्षात 1100 कोटी रुपयांचा निधी दिला. आमच्याकडे एक वर्ष बाकी आहे. ज्यावेळेस निवडणुकीला निलेश लंके सामोरे जाईल त्यावेळेस मी मत मागायला येईल, तेव्हा पाच वर्षाच्या कार्यकाळात 1500 कोटी रुपयांचा निधी पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी खर्च केलेला आम्ही तालुक्याला दाखवून देऊ. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सध्या अस्वस्थता आहे वेगवेगळी लोक आरक्षणासाठी मागणी करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापुढे आम्ही नतमस्तक होत असतो. त्यांचा वारसा पुढे घेऊन आम्ही जात आहे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लागता राज्याचा वातावरण खराब होऊ देऊ नका. ओबीसींनी आदिवासी धनगर यांनी काही भूमिका घ्यायची धर्माधर्मात अंतर पडून चालणार नाही. आम्ही आरक्षणासंदर्भात प्रयत्न केला, पण दुर्दैवाने हायकोर्ट सुप्रीम कोर्टात ते टिकले नाही. चांगल्या भावनेने आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला. आरक्षणात राजकारण नको, आम्हाला माणसे जोडायचे आहे. कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये न्यायव्यवस्थेला मान्य होईल अशा पद्धतीने आपण मार्ग काढणार आहोत. परंतु काही जण समजून घेत नाही. आम्ही तुम्हाला साथ देणारे आहोत जीवाला जीव देणारे माणस आहोत. आम्ही सातत्याने वकिलांशी चर्चा करत आहोत. हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने नाकारण्यासंदर्भातली मुद्दे काय आहेत याचा निरसन करण्याचे काम चालू आहे.

काही पुढारी निवडणुकीला सामोरे जाताना अशा प्रकारच्या देवदर्शन यात्रा करत असतात. त्यावेळेस त्यांना लोकांची आठवण येत असते. मात्र निलेश लंके दरवर्षी देवदर्शन येथे आयोजन करतात. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अर्जून भालेकर बाजार समिती सभापती बाबाजी तरटे, उपसभापती बापू शिर्के, जि. प. माजी सदस्य राणीताई लंके, पारनेर चे नगराध्यक्ष नितिन आडसुळ, अशोक सावंत, ज्ञानदेव लंके, दिपक लंके, अमृता रसाळ, राजेंद्र चौधरी, मधुकर उचाळे, कारभारी पोटघन, मेजर डॉ बाळासाहेब कावरे,  जितेश सरडे, संजय लाकुडझोडे, सुदाम पवार, आबासाहेब खोडदे, शिवाजी लंके, ॲड.राहूल झावरे, संदीप चौधरी, सचिन गवारे, दादा शिंदे, संदिप सालके, अशोक घुले, दिपक पवार, धनंजय गाडे, राजेश्वरी कोठावळे, वैजंता मते, उमाताई बोरुडे, संतोष ढवळे, बाळासाहेब खिलारी, मारुती रेपाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके प्रतिष्ठाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

पारनेर येथे उपजिल्हा रुग्णालय साठी मागणी करण्यात आली परंतु ते शासकीय नियमात बसत नव्हते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात लक्ष घालून खास बाब म्हणून मंजूर करून दिले आहे. कान्हूर पठार पुणेवाडी जातेगाव उपसा सिंचन योजना मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करत आहे. लक्ष घालून त्याला मान्यता द्यावी . मी आमदार झाल्यानंतर लोक म्हणायचे की हा काय विकास करू शकतो तो मुद्दा खोडून काढण्याचे काम केले आहे. 1100 कोटी रुपयांचा निधी तालुक्याला अजित दादा पवार यांच्या माध्यमातूनच मिळाला असल्याचे आमदार निलेश लंके यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT