Latest

Nigeria: नायजेरियामध्ये धार्मिक तणाव आणि हिंसाचार, हल्ल्यात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू

निलेश पोतदार

नायजेरिया : पुढारी ऑनलाईन वाढत्या वांशिक आणि धार्मिक तणावामुळे मध्य नायजेरियात हिंसाचाराची परिस्थिती आहे. दरम्यान, सशस्त्र गटांच्या हल्ल्यात आतापर्यंत 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अल जझीरा वृत्‍त वाहिनीच्या म्हणण्यानुसार, सशस्त्र गटांनी मध्य नायजेरियातील शहरांना लक्ष्य केले असून, त्यात 113 लोक मारले गेले आहेत.

पठार नायजेरिया मध्ये पसरलेला वांशिक आणि धार्मिक तणाव मध्य बेल्ट मधील राज्‍यांमधून येतो. मध्य नायजेरियात हवामान बदल आणि वाढत्‍या कृषीमुळे समुदायांमधील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. त्‍यामुळे मुस्लिम मेंढपाळ आणि ख्रिश्चन शेतकरी यांच्यामधील तणाव वाढला आहे. त्यामुळे आंतरजातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

अल जझीराच्या वृत्‍तानुसार, "निरपराध नागरिकांविरुद्ध चालू असलेले हल्ले थांबवण्यासाठी सरकारकडून सक्रिय उपाययोजना केल्या जातील," असे पठार राज्याचे गव्हर्नर कालेब मुताफवांग यांचे प्रवक्ते ग्यांग बेरे यांनी सांगितले.


हेही वाचा :

SCROLL FOR NEXT