Latest

Priyanka Chopra : प्रियांका रोमँटिक मूडमध्ये असताना निक मात्र सासूसोबत… (Video viral)

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसीगर्ल आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ( Priyanka Chopra ) पती निक जोनासने १८ जुलैला तिचा ४० वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. या वाढदिवसाचे अजूनही काही फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रियांका रोमँटिक मूडमध्ये दिसतेय. तर प्रियांकाचा पती निक त्याच्या सासू मधू चोप्रासोबत मौजमस्ती करताना दिसतोय. यावरून चाहत्यांनी प्रियांका मूडमध्ये असताना निक सासूसोबत कसा काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

प्रियांकाने ( Priyanka Chopra ) तिचा ४० वा वाढदिवस काही मोजक्यात कुटुंबीय आणि मित्रमैत्रींसोबत मेक्सिकोत साजरा केला आहे. यावेळी प्रियांका रेड थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये तर निकने प्रिन्टेड नाइट सूटमध्ये दिसला. यावेळी दोघांची जोडी खूपच क्यूट आणि ग्लॅमरस दिसत होती. याच दरम्यान प्रियांकाच्या वाढदिवसामधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत पहिल्यांदा प्रियांका पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये डायनिंग टेबलवर बसलेली दिसतेय. तर निक प्रियांकाला किस करताना आणि वाढदिवसांची पार्टी एन्जॉय करताना हॅडसम दिसला. यानंतर मात्र, प्रियांका रेड थाई हाई स्लिट ड्रेसमध्ये समुद्राच्या वाळूत अनवाणी पायांनी डान्स करताना दिसली. तर याच दरम्यान निक मात्र, प्रियांकासोबत नव्हे तर चक्क सासू मधू चोप्रासोबत थिरकला. यावेळी मधू चोप्रा रेड रंगाच्या कुर्ता आणि ब्लॅक रंगाच्या लेगिंग्जमध्ये हटके दिसत होत्या. तर यावेळी प्रियांकाने एक लाल रंगाची पर्सदेखील कॅरी केली होती.

हा व्हिडिओ शेअर होताच चाहत्यांनी भरभरून आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एका नेटकऱ्यांने प्रियांकाचा वाढदिवस असताना निक सासूसोबत कसा काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर काही युजर्सने 'Lovely and Wonderful Couple…God Bless them…!', 'Honestly the first one and the one in that red dress is so so good'. 'They look so happy ?', 'Oh…my Love couple ❤️', 'burning up for each other.', 'Superb', 'So cute ❤️', 'The song is also very beautiful'. असे म्हटलं आहे. याशिवाय काही युजर्सनी हार्ट आणि फायरचे ईमोजी शेअर केले आहेत. या व्हिडिओ आतापर्यत जवळपास एक हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, प्रियांका चोप्रा बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. प्रियांका 'इट्स ऑल कमिंग बॅक टू मी' आणि सिटाडेल वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. रुसो ब्रदर्स निर्मित, सिटाडेल ही वेबसीरिज अॅमेझॉन प्राइमवर रिलीज होणार आहे. याशिवाय प्रियांका फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात आलिया भट्ट आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT