Latest

NIA Raids In India: एनआयएची दहशतवादविरोधी मोठी कारवाई; ISIS चे बल्लारी मॉड्यूल उद्ध्वस्त

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज (दि.१८) पहाटे महाराष्ट्रासह चार राज्यांत १९ ठिकाणी छापे टाकले. दरम्यान एनआयएने आजच्या कारवाईत बंदी घातलेल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या बल्लारी मॉड्यूलच्या आठ दहशतवाद्यांना अटक केली. यामध्ये त्यांचा म्होरक्या मिनाझ उर्फ मोहम्मद सुलेमान यांचा समावेश आहे. तसेच एनआयएने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि इतर साहित्य देखील जप्त केले आहे, या संर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (NIA Raids In India)

राष्ट्रीय तपास यंत्रणेने आज पहाटे भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादविरोधी छापे टाकले. दरम्यान इस्लामिक स्टेटशी संबंधित दहशतवादी गटातील ८ संशयित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एएनआयएने संशयितांना अटक केलेल्या ठिकाणाहून सल्फर, पोटॅशियम नायट्रेट, चारकोल, गनपावडर, साखर आणि इथेनॉल, धारदार शस्त्रे, बेहिशेबी रोकड आणि गुन्ह्याची कागदपत्रे, स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणांसह स्फोटकं, कच्चा माल जप्त केल्याचे एनआयएने सांगितले आहे, असे 'हिंदुस्थान टाईम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. (NIA Raids In India)

एनआयएच्या (NIA) पथकांनी केलेल्या कारवाईत कर्नाटकातील बल्लारी आणि बेंगळुरमध्ये पसरलेल्या १९ ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात अमरावती, मुंबई आणि पुणे तर झारखंडमधील जमशेदपूर आणि बोकारो आणि नवी दिल्लीत छापेमारी केल्याचे म्हटले आहे. छाप्यांदरम्यान अटक करण्यात आलेले आठ ISIS एजंट हे प्रतिबंधित संघटना ISIS च्या दहशतवाद आणि दहशताशी संबंधित कृत्ये आणि त्यांना प्रोत्साहन देण्यात काम करत असल्याचेही एनआयएने दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले. (NIA Raids In India)

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT