Earthquake In India: साखळी भूकंपाच्या धक्याने कारगिल, लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले | पुढारी

Earthquake In India: साखळी भूकंपाच्या धक्याने कारगिल, लडाखसह जम्मू-काश्मीर हादरले

पुढारी ऑनलाईन डेस्क: कारगिल, लडाख आणि जम्मू-काश्मीरमध्ये सलग चारवेळा साखळी भूकंपाचे जोरदार धक्के बसले. कारगिल, लडाखमधील भूकंपाची तीव्रता ५.५ आणि ३.८ रिश्टर तर जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ही ४.८ आणि ३.६ रिश्टर अशी नोंदवण्यात आली आहे. भारतातील उत्तरेकडे आज (दि.१८) दुपारी ४ वाजेच्या सुमारास सलग चारवेळा भूकंपाचे धक्के बसले. (Earthquake In India)

लडाखच्या कारगिलमध्ये सोमवारी(दि.१८) ५.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या जोरदार भूकंपाचे धक्के उत्तर भारत आणि पाकिस्तानच्या काही भागातही जाणवले. हा भूकंप सोमवारी दुपारी ३ वाजून ४८ मिनिटांनी झाला. या भूकंपाची केंद्रबिंदू १० किमी खोलीवर होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने त्यांच्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे. (Earthquake In India)

हेही वाचा:

Back to top button