Latest

New Toyota Fortuner : फॉर्च्युनर दिसणार नव्या डिझाईनसह नवीन लुकमध्ये; जाणून घ्या सविस्तर

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : एसयुव्ही सेगमेंटमधील सर्वात जास्त पसंतीची टोयोटा फॉर्च्युनर कार लवकरच सुधारित आवृत्तीमध्ये दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी पुढच्या वर्षी तिच्या या प्रसिद्ध एसयुव्हीला नव्या रंगासह नवे डिझाईनमध्ये आणणार आहे. या नव्या फॉर्च्युनरमधील फिचर्स आणि नव्या तंत्रज्ञानाबद्दलची यामध्ये माहिती घेऊ. (New Toyota Fortuner)

कशी असेल नवी फॉर्च्युनर कार

मीडिया रिपोर्टनुसार टोयोटाच्या आगामी चौथ्या जनरशेनच्या फॉर्च्युनर मॉडेलमध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या पहायला मिळतील. कंपनीने या बदलांसाठीची तयारी सुरू केली आहे. सध्याची कारच्या तुलनेत नव्या फॉर्च्युनरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण असे बदल केलेले पहायला मिळणार आहेत. (New Toyota Fortuner)

कधीपर्यंत येईल ही नवी एसयुव्ही

कंपनीकडून अजूनही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र एका अहवालानुसार पुढच्या वर्षी लॉन्च करेल. या अहवालामध्ये असे देखील म्हटले आहे की, कंपनी ही कार प्रथम थायलंडमध्ये लॉन्च करेल.

आगामी फॉर्च्युनरचा लुक आणि इंजिन

कंपनी या नवीन फॉर्च्युनरच्या इंटीरियर आणि एक्सटीरियर, तसेच इंजिनमध्ये देखील बदल करणार आहे. अशा प्रकारे या SUV ला एकदम नवीन लुक आणि दमदार बनवले जात आहे. यातील नवीन बॉडी पॅनल्स, अधिक चांगले फीचर्स तसेच हायब्रिड इंजिन पर्याय देखील या कारमध्ये दिले जाण्याची शक्यता आहे.

सध्याच्या फॉर्च्युनर IMV आर्किटेक्चर पद्धत वापरलेली आहे. आता या नव्या आगामी कारमध्ये TNGA प्लॅटफॉर्म पद्धत वापरली जाण्याची शक्यता आहे. कंपनीच्या नवीन इनोव्हा हायक्रॉसमध्ये TNGA हा प्लॅटफॉर्म वापरला जाणार आहे. याशिवाय, कंपनी लँड क्रूझरसह अनेक एसयूव्हीमध्ये देखील याच प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे. या नव्या पद्धतीमुळे नव्या फॉर्च्युनरचा लुकमध्ये थोडासा बदल जाणवणार आहे.

नवीन फॉर्च्युनरमधील सुरक्षा फिचर

फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन फॉर्च्युनर ADAS सारख्या सर्वोत्तम सुरक्षा फिचर्ससह सुसज्ज असेल. तसेच सध्याच्या कारमधील हायड्रॉलिक स्टीयरिंग व्हील बदलून इलेक्ट्रिक स्टीयरिंग व्हील असा बदल केला जाणार आहे. यासोबतच यामध्ये व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल हे फिचर देखील दिले जाणार आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT