Latest

New Power Tariff : वीज दिवसाला ८ तास २० टक्क्यांपर्यंत स्वस्त

अमृता चौगुले

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : केंद्र सरकारने (Power Ministry) शुक्रवारी वीज दर प्रणालीत दोन मोठे बदल केले आहेत. टाईम ऑफ डे रेट तसेच स्मार्ट मीटरिंग तरतुदींतील सुधारणांशी संबंधित असलेल्या या बदलांचा ग्राहकांना नक्कीच फायदा होणार आहे. वेळेनुसार दर आकारणी होईल. 24 तास सारख्याच दरांऐवजी दिवसातील वेगवेगळ्या वेळांत विजेचे दर वेगवेगळे असतील. (New Power Tariff)

सूर्य आकाशात असताना (दिवसाचे 8 तास) दर सामान्य दरापेक्षा 10 ते 20 टक्क्यांनी कमी असतील. पीक अवर्समध्ये (साधारणपणे रात्रीची व्यग्र वेळ) दर 10 ते 20 टक्कयांनी जास्त असतील. एप्रिल 2024 पासून 10 किलोव्हॅट आणि त्याहून अधिक मागणी असलेल्या व्यावसायिक ग्राहकांसाठी ही योजना लागू होणार आहे. ग्राहकांनी स्वस्त दरातील विजेच्या वेळेनुसार आपल्या कामांचे शेड्यूल्ड ठरविल्यास त्यांना नक्कीच या योजनेचा लाभ होणार आहे.(New Power Tariff)

एप्रिल 2025 पासून शेती वगळता इतर सर्व ग्राहकांसाठी ही योजना लागू होईल. त्यासाठी स्मार्ट मीटर बसवावे लागणार आहे. योजनेसह बिलिंग त्यानंतर लगेच सुरू होईल. पीक अवर्समध्ये (रात्री) वीज ग्राहक जास्त वीज वापरण्यापासून परावृत्त होऊ शकतील. दिवसातील 8 तास वीज वापराचे व्यवस्थापन करून बिलात 20 टक्क्यांपर्यंत बचत करता येईल.

नव्या मीटरमुळे वीजचोरीला आळा

नव्या मीटरिंगचे वैशिष्ट्य म्हणजे दुरूनच वाचून बिलाचे मूल्यांकन शक्य होणार आहे. त्यामुळे वीजचोरी थांबेल.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT