Yevgeny Prigozhin : बंड करुन पुतिन यांना टेन्शन देणारा 'येवगेनी प्रिगोझीन' कोण आहे? | पुढारी

Yevgeny Prigozhin : बंड करुन पुतिन यांना टेन्शन देणारा 'येवगेनी प्रिगोझीन' कोण आहे?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियामध्ये वॅगनर ग्रुपने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंडाचं निशाण रोवलं आहे. वॅगनर ग्रुपचे मोठ्या संख्येने सैनिक मॉस्कोच्या दिशेने जात आहेत. त्यांना रोखण्यासाठी रशियन सैन्याने मार्गावर जोरदार बॅरिकेट्सही लावले आहेत. रशियन सैन्य आणि वॅगनर ग्रुप यांच्यात रशियन शहरात रोस्तोव्हमध्ये भीषण लढत झाल्याचे वृत्त आहे. (Yevgeny Prigozhin)

वॅगनर ग्रुपला एकेकाळी पुतिनचे खासगी सैन्य म्हटले जायचे. या समूहाच्या सैनिकांनी रशियन सैन्यासोबत युक्रेनमध्ये युद्धही केले आहे. पण, या काळात वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रिगोझीन यांनी रशियन सैन्यावर अनेकदा टीका केली आहे. प्रिगोझीन यांनी पहिल्यांदाच पुतिन यांना नामोहरम करण्याची थेट धमकी दिली आहे. वॅगनर ग्रुपच्या सैनिकांनी मॉस्कोकडे कूच केल्यानंतर क्रेमलिन आणि ड्यूमा, रशियन संसदेतील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Yevgeny Prigozhin)

येवगेनी प्रिगोझिन यांचा पुतीन यांना विरोध का?

पुतिन यांना आव्हान देणारे रशियात कोणी नाही, असे सर्वसाधारणपणे मानले जाते. मात्र, येवगेनी प्रिगोझीनची धमकी गांभीर्याने घेतली जात आहे. येवगेनी प्रिगोझीन यांनी बाखमुत येथील वॅगनर प्रशिक्षण केंद्रावर क्षेपणास्त्र हल्ल्यासाठी रशियाला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यासाठी रशियाला शिक्षा देण्याची शपथही त्यांनी घेतली आहे. या हल्ल्यामुळे वॅगनर ग्रुपचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रिगोझीन यांनी जाहीर केले की. आम्ही मॉस्कोला जात आहोत. ज्यांनी आज आपल्या लोकांचा नाश केला, ज्यांनी दहा हजार, हजारो रशियन सैनिकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्यांना शिक्षा होईल, असे त्यांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. जो कोणी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करेल, त्याला आम्ही सोडणार नाही, अशा इशाराही प्रिगोझीनने दिला आहे. (Yevgeny Prigozhin)

येवगेनी प्रिगोझीन कोण आहे?

येवगेनी प्रिगोझिन यांचा जन्म लेनिनग्राडमध्ये पुतीननंतर सुमारे नऊ वर्षांनी १९६१ मध्ये झाला होता. हे शहर आता सेंट पीटर्सबर्ग म्हणून ओळखले जाते. तो लहान असतानाच त्याचे वडील वारले. प्रीगोझिनने स्वतः सांगितले की त्याची आई रुग्णालयात काम करते. प्राथमिक शिक्षणानंतर प्रिगोझीन क्रीडा अकादमीत सामील झाले. एक व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याला यश मिळू शकले नाही. शिक्षण पूर्ण केल्यानंतर, येवगेनी प्रिगोझिन क्षुल्लक गुन्हेगारांच्या जमावात सामील झाला. (Yevgeny Prigozhin)

येवगेनी प्रिगोझिन सोव्हिएत युनियनमध्ये लुटत असे

१९८० च्या एका संध्याकाळी, सोव्हिएत युनियनमध्ये लिओनिड ब्रेझनेव्हच्या राजवटीत, १८ वर्षीय प्रीगोझिन मध्यरात्री सेंट पीटर्सबर्ग कॅफेमधून बाहेर पडला. एका महिलेला रस्त्यावरून एकटी चालताना पाहिले. प्रीगोझिनच्या मित्राने सिगारेट मागून महिलेचे लक्ष विचलित केले. ती तिची पर्स उघडण्यासाठी गेली असता प्रीगोझिन तिच्या मागून आला आणि तिचा गळा पकडला. ती बेशुद्ध होईपर्यंत त्याने तिचा गळा दाबला. यानंतर प्रीगोझिनने तिचे सोन्याचे कानातले काढून खिशात टाकले आणि तेथून पळ काढला. (Yevgeny Prigozhin)

दरोड्यांप्रकरणी १३ वर्षांची शिक्षा (Yevgeny Prigozhin)

१९८१ मध्ये रशियन न्यायालयाने प्रिगोझीनला दरोड्यांप्रकरणी १३ वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर प्रिगोझीनला जवळपास एक दशक तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. १९९० मध्ये सोव्हिएत युनियनच्या विघटना दरम्यान त्याची सुटका झाली. प्रिगोझिन यानंतर सेंट पीटर्सबर्गला परतले. त्या काळात रशियात खूप बदल घडत होते. धूर्त किंवा हिंसक लोकांकडून मोठ्या स्थावर मालमत्ता जप्त केल्या जात होत्या. कारण त्या काळात रशियातील कायद्याचे राज्य जवळजवळ संपले होते. प्रिगोझिनने हॉटडॉग्स विकून माफक सुरुवात केली. त्याने आपल्या आयुष्यात दिलेल्या एकमेव मुलाखतीत सांगितले की, आम्ही महिन्याला $1,000 कमावले, ज्याची किंमत रुबल नोट्समध्ये डोंगराएवढी होती. माझ्या आईला सगळ्या नोटा मोजता येत नव्हत्या. (Yevgeny Prigozhin)

क्रिमियावरील हल्ल्या दरम्यान केली वॅगनर ग्रुपची स्थापना

रशियाने २०१४ मध्ये क्रिमियाला जोडले. तेव्हा प्रीगोझिनने वॅगनर ग्रुपला सत्तेत आणले. या दरम्यान, रशियन आणि युक्रेनियन सैन्यांमधील युद्धात वॅगनर ग्रुपचे सैनिकही सहभागी झाले होते. प्रीगोझिन यांनी पुतीन यांना खासगी लष्करी कंपन्या स्थापन करण्याचा सल्ला दिला. तथापि, बर्‍याच तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की वॅगनर ग्रुपची सुरुवात रशियन गुप्तचर संस्था जीआरयूची लष्करी गुप्तचर युनिट म्हणून झाली. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या एका माजी अधिकार्‍याने सांगितले की, काहींचा तो GRU चा भाग आहे असे वाटले असेल. परंतु, शेवटी तो प्रीगोझिनचा प्रकल्प होता. रशियन संरक्षण मंत्रालयाने प्रीगोझिनला दक्षिण रशियातील मोल्किनो येथे जमीन दिली. जिथे प्रीगोझिनशी संबंधित कंपन्यांनी मुलांच्या छावणीच्या नावाखाली मिलिशियासाठी बेस कॅम्प उभारला. (Yevgeny Prigozhin)

हेही वाचंलत का?

Back to top button