Latest

Neha Dhupia : ‘ही तर वेस्ट इंडीजची हिरोईन’, नेहाचा रॅम्प वॉक पाहून…

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपिया नेहमीच चर्चेत राहते. तिने नुकताच रॅम्प वॉक केला आहे. (Neha Dhupia ) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही लोक तिच्या वाढलेल्या वजनावर कमेंट करत टीका करत आहेत. काही जण तिची खिल्ली उडवत आहेत. (Neha Dhupia )

नेहा धूपियाचा रॅम्प वॉक व्हायरल

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धूपिया चित्रपटांपेक्षा अधिक आपल्या खासगी आयुष्याविषयी चर्चेत राहते. ती बिनधास्त वक्तेपणासाठीही ओळखली जाते. जर कुणी तिच्यावर निशाणा साधला तर गप्प राहत नाही, तीदेखील सडेतोड उत्तर देते. नेहाने नुकताच रॅम्प वॉक केलाय. तिचा व्हिडिओ समोर येताच लोक कॉमेंट करू लागले. अनेकांनी तिच्या वाढलेल्या वजनावर निशाणा साधला. एका नेटकऱ्याने म्हटलं की, ही तर वेस्ट इंडिजची हिरोईन दिसत आहे.

नेहा धूपियाचा रॅम्प वॉक व्हिडिओ

सोशल मीडिया पर नेहा धूपिया (Neha Dhupia Ramp Walk Video)चा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती रॅम्प वॉक करताना दिसते. तिने सिल्व्हर ग्रे कलरचा सीक्वेंस गाऊन परिधान केलाय. तिला रॅम्पवपर चालताना पाहून काही युजर्स खूप टीका करत आहेत.

यूजर्स करत आहेत कॉमेंट

एका युजरने लिहिलं, 'वेस्ट इंडीजची हिरोईन दिसत आहे.' एका अन्य युजरने कॉमेंट केलं आहे, 'ही कोणती च्वॉईस आहे मॅडम जी.' काही लोकांनी तर तिच्या वाढलेल्या वजनावर निशाना साधला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT