Latest

परीक्षा तणावाचा आणखी एक बळी, कोटामध्‍ये विद्यार्थ्याने संपवले जीवन

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आयआयटी जीईई ( IIT JEE) आणि नीट ( NEET ) या राष्ट्रीय प्रवेश परीक्षांसाठी देशातील कोचिंग हब म्हणून ओळखले जाणारे राजस्थानमधील कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी सुमित पांचाळ याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं. तो मूळचा हरियाणातील रोहतक येथील रहिवासी आहे. कोटातील कुन्हडी भागातील एका वसतिगृहात मागील एक वर्ष एका खासगी कोचिंग संस्थेत परीक्षेची तयारी करत होता. कोटामध्ये या वर्षी आतापर्यंत आठ कोचिंग विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे.

सुमितने रविवारी दुपारी हॉस्टेलच्या मेसमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. त्यानंतर तो खोलीतून बाहेर आला नाही. सायंकाळी नातेवाइकांचा फोनही सुमितने उचलला नाही. त्याच्या वडिलांनी वसतिगृहाला याची माहिती दिली. वसतिगृह कर्मचार्‍याने सुमितच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रात्री 9.30 च्या सुमारास खोलीचा दरवाजा तोडला असता सुमितने गळफास लावून घेवून जीवन संपवल्‍याचे निदर्शनास आले.

वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी सुमितला महाराणा भूपाल सिंग रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी या घटनेची माहिती सुमितच्या कुटुंबीयांना दिली. नातेवाईक सोमवारी सकाळी कोटा येथे पोहोचले त्यानंतर मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.

या प्रकरणाबाबत सुमितच्या नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचे सांगितले. सुमितचे वडील विजयपाल पांचाळ यांचे रोहतकमध्ये फॅब्रिकेशनचे दुकान आहे. तीन भावंडांमध्ये सुमित हामोठा होता. वडील म्हणाले, सुमितला काही त्रास नव्हता. जवळपास रोजच त्याच्याशी मोबाईलवर बोलायचे.

आजोबा राजकुमार पांचाळ म्हणाले, मी रविवारी वसतिगृहातील कर्मचाऱ्याशी बोललो होतो आणि त्याने सर्व काही ठीक असल्याचे सांगितले होते. त्यांनी सांगितले की मी वसतिगृहातील कर्मचाऱ्यांकडून माझ्या नातवाची माहिती घेत होतो. सुमितने जीवन संपवले नसू त्‍याची हत्या आहे. याची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही त्‍यांनी केली.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT