Latest

AI बनले सेक्स गुरू : लैंगिक शिक्षणासाठी पहिल्यांदाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर | AI Sex Coach

मोहसीन मुल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (AI) वापर विविध क्षेत्रात होऊ लागलेला आहे. तंत्रज्ञान, आरोग्य, शिक्षण अशा किती तरी क्षेत्रात AIचा वापर होतो आहे. आता काही कंपन्यांनी लैंगिक शिक्षण देण्यासाठी AI कोचची निर्मिती केली आहे. अमेरिकेतील Beducated या कंपनीने हा प्रयोग केला आहे.

संबंधित बातम्या

अमेरिकेतील मॅशाबेल या वेबसाईटने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. युवकांना सर्वसमावेश असे लैंगिक शिक्षण देण्यासाठी AIचा वापर आवश्यक असल्याचे या वेबसाईटने म्हटले आहे. युवकांना लैंगिक शिक्षण देण्यासाठी योग्य अशी व्यवस्था नसल्याने या संस्थाचे कार्य महत्त्वाचे आहे, असेही या वेबसाईटने म्हटले आहे. विविध लैंगिक आजार आणि व्याधी यांच्यावर खुलेपणाने बोलले जात नाही, त्यामुळे या तंत्राचा वापर उपयुक्त ठरणार आहे.

Beducated या वेबसाईटवर लैंगिकतेसंदर्भात १०० विविध अभ्यासक्रम आहेत. आता या संस्थेच्या वेबसाईटवर AI वर आधारित चॅटबॉट बनवले आहे. ज्यांनी या वेबसाईटवर नोंदणी केलली नाही, ते दिवसाला १० प्रश्न या चॅटबॉटला विचारू शकतात. तर जे Beducatedचे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी ही सेवा मोफत असणार आहे.

पण या AIने दिलेली माहिती ही प्रायोगिक असून तो वैद्यकीय सल्ला मानला जाऊ नये, असे या संस्थेने म्हटले आहे. सेक्स संदर्भात विविध प्रश्नांची उत्तरे हा AI देतो आणि या वेबसाईटवर उपलब्ध असलेला योग्य तो अभ्यासक्रमही सुचवतो.

फक्त समस्याच नाही तर लैंगिक आनंदावरही मार्गदर्शन | AI Sex Coach

Beducatedचे सहसंस्थापक मारिया फ्रेया म्हणाल्या, "आता जर जागतिक कल पाहिला तर लैंगिक शिक्षणावर निर्बंध आणले जात आहेत, याचा आम्ही विरोध करतो. आताच्या स्थितीत AIच्या मदतीने लैंगिक शिक्षण देणे हा एक आशेचा किरण आहे. Beducated फक्त लैंगिकेते संदर्भातील समस्यांवर मार्गदर्शन करत नाही तर लैंगिक जीवनातील आनंदावरही सल्ला देतो."

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT