पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? शरद पवार की अजित पवार गटाची, या वादावर शुक्रवार (दि.७) पासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू झाली. या सुनावणीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगासमोर हजर झाले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलत असताना खोचक टिपण्णी केली. या टिपण्णीनंतर राजकीय वर्तुळासह सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे. (NCP Jayant Patil)
संबधित बातम्या
अजित पवार गटाने आपलाच गट खरी राष्ट्रवादी असल्याचे सांगताना, शरद पवारांनी मनमानी पद्धतीने पक्ष चालविला असून प्रदेशाध्यक्षपदी जयंत पाटील यांची केलेली नियुक्ती बेकायदेशीर आहे, असा दावा केला; तर अजित पवार गटाच्या दस्तावेजांमधील त्रुटींच्या आधारे शरद पवार गटाने युक्तिवाद केला. सोमवारी (९ ऑक्टोबर) पुढील सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, या सुनावणीसाठी पक्षाचे नेते शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगासमोर हजर झाले होते. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत होते. परंतु आयोगासमोर ते पोहोचले नाहीत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे की,"आदरणीय शरद पवार साहेबांच्या कार्यशैलीतूनच मोठी झालेली ही लोकं आहेत. आज तीच लोकं पवार साहेबांच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत आहे. घरातील लहान मुलगा जेव्हा मोठा होतो, त्याला स्वतंत्र व्हायचं असतं त्यावेळी तो स्वतःचं घर बांधतो. तो वडिलांना घरातून काढत नाही. याच्यातच सगळं आलं"
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुपचंद्र पांडेय आणि अरुण गोयल यांच्यासमोर जवळपास दोन तास सुनावणी चालली. शरद पवार गटातर्फे ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली; तर अजित पवार गटातर्फे कायदेतज्ज्ञ नीरज किशन कौल, सिद्धार्थ भटनागर, मनिंगरसिंग आणि सिद्धार्थ धर्माधिकारी आयोगासमोर हजर झाले होते. सुनावणीतील शरद पवार व अजित पवार गटाचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे
शरद पवार गटाचा दावा
अजित पवार गटाचा दावा