Latest

Bharat Jodo Yatra | अखेर ठरलं! भारत जोडो यात्रेत शरद पवार, आदित्य ठाकरे ११ नोव्हेंबरला सहभागी होणार

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज बुधवारी (दि.९) महाराष्ट्रातील तिसरा दिवस आहे. या यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) युवा नेते आदित्य ठाकरे ११ नोव्हेंबर रोजी सहभागी होणार आहेत. तर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड उद्या यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. (Bharat Jodo Yatra) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे उद्या पक्षाच्या 'भारत जोडो यात्रे'त सहभागी होणार असल्याचेही चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील टप्पा सोमवारी देगलूर येथून सुरू झाला होता. या यात्रेतील भारतयात्रींमध्ये विविध राज्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. भारत जोडो यात्रेचा साडेतीन हजार किलोमीटर अंतराचा कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंतचा प्रवास आहे.

भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, खासदार रजनीताई पाटील, खासदार कुमार केतकर, आमदार परिणती शिंदे आदींसह अनेक नेत्यांचा सहभाग आहे.
या यात्रेदरम्यान रस्त्यावरून चालताना राहुल गांधी यांनी काल मंगळवारी शेतात रब्बीची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना हात उंचावून प्रतिसाद दिला होता. तर वन्नाळी येथून श्रीजया चव्हाण ह्या पदयात्रेत सहभागी होत, राहुल गांधी यांच्याशी संवाद साधत त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला होता. यात्रेत जवळपास २५ हजार नागरिकाचा सहभाग आहे.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT