नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: हवाला प्रकरणात अडकलेले राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर मलिक यांनी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आजारपणामुळे जामीन दिला (Nawab Malik) जावा, असे मलिक यांनी याचिकेत म्हटले आहे.
मलिक यांच्यावर गतवर्षी हवालाच्या अनुषंगाने गंभीर आरोप झाले होते. गतवर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून ते तुरुंगात आहेत. कुर्ला येथील मालमत्ता तसेच कुख्यात डाॅन दाऊद इब्राहिम आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी सरदार खान यांच्यासोबत मलिक यांनी बैठका केल्याचा आरोप ईडीने (Nawab Malik) केलेला आहे.
यासंदर्भात न्यायालयात दोषारोप पत्रही दाखल झालेले आहे. विशेष न्यायालयाने दोषारोप पत्राची दखल घेत पुढील कारवाईसाठी ईडीला परवानगी दिली होती. ईडीने या प्रकरणात 17 जणांना साक्षीदार बनविले असून त्यात दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर, हसिना पारकरचा मुलगा अलिशाह पारकर तसेच सरदार शाहवली खान यांचा (Nawab Malik) समावेश आहे.