Latest

Navratri 2023 : ज्येष्ठ नागरिकांना सौंदतीत रेणुकादेवीचे दर्शन होणार सुलभ

दिनेश चोरगे

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  नवरात्रौत्सवाला रविवारपासून (दि. 15) प्रारंभ झाला आहे. या काळात विविध मंदिरांमध्ये देवीदेवतांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. या काळात सौंदत्तीतील रेणुकादेवीच्या दर्शनासाठी दहा लाख भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर 65 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सुलभ देवदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी एसबीपी महेश यांनी दिली आहे.

सामान्य रांगेसह 100 रुपये शुल्क भरून दर्शनाची सोय असलेली विशेष रांगही आहे. देवी दर्शनासाठी ज्येष्ठ नागरिकही मोठ्या संख्येने येत असतात. शासनाने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार देवी दर्शनासाठी येणार्‍या 65 वर्षांवरील भाविकांना एक विशेष खिडकीद्वारे दर्शनाची सोय करण्यात आली आहे.

    हेही वाचा :

SCROLL FOR NEXT