Navratri 2023 : दुर्गेचे तिसरे रूप : चंद्रघंटा | पुढारी

Navratri 2023 : दुर्गेचे तिसरे रूप : चंद्रघंटा

पिण्डजप्रवरारूढा चण्डकोपास्त्रकेर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता॥

दुर्गेच्या तिसर्‍या शक्तीचे नाव ‘चंद्रघंटा’ आहे. देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे. तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते. शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे. या देवीला दहा हात आहेत. या दहा हातांमध्ये खडग, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते.

माता चंद्राघंटाच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जाते. माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते. तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी आणि निर्भय होतो. तिच्या घंटेच्या आवाज पे्रतबाधेपासून भक्तांचे रक्षण करतो. या देवीच्या चरणी शरणागती पत्करल्यास घंटेचा आवाज निनादतो. या देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे. या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होेते. आवाजात मधुरता येते. माता चंद्राघंटाचे भक्त आणि उपासक जेेथे जातात तेथील लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचा अनुभव करतात.

Back to top button