Latest

अधिर रंजन चौधरी यांना झटका! राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

backup backup

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधिर रंजन चौधरी चांगलेच अडचणीत आले असून राष्ट्रीय महिला आयोगाने त्यांना नोटीस पाठवित लेखी म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय 3 ऑगस्ट रोजी आयोगाच्या कार्यालयात स्पष्टीकरण देण्यासाठी हजर रहावे, असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक पत्र लिहिले असून त्यात अधिर रंजन चौधरी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख 'राष्ट्रपती' ऐवजी 'राष्ट्रपत्नी' असा केला होता. जीभ घसरल्यामुळे ती चूक झाल्याचे चौधरी यांनी नंतर संसदेत सांगितले होते. माफी मागण्यासाठी आपण राष्ट्रपतींकडे वेळ मागितली आहे, मात्र भाजपवाले सोनिया गांधी यांना का लक्ष्य करीत आहेत? हे खरा प्रश्न असल्याचे चौधरी यांनी सांगितले. मी बंगाली असल्याने हिंदी व्यवस्थित येत नाही. संसदेत मला म्हणणे मांडू द्या, असेही अधिर रंजन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांसमोर नमूद केले.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT