Latest

नाशिक : ‘आरटीई’साठी राज्यात साडेतीन लाख अर्ज; उद्या शेवटची संधी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अर्थात आरटीईनुसार खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आहे. संकेतस्थळाची तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर पालकांकडून अर्ज भरण्यास वेग आला आहे. आतापर्यंत संपूर्ण राज्यातून आरटीईसाठी सुमारे साडेतीन लाख अर्ज आले आहेत. पालकांना ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी शनिवारी (दि. 25) अखेरची संधी मिळणार आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई कायद्यांतर्गत खासगी शाळांना मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांना 25 टक्के मोफत प्रवेश दिला जात आहे. राज्यभरात 8 हजार 828 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 969 जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी गुरुवारी (दि. 23) सायंकाळपर्यंत राज्यभरातून 3 लाख 47 हजार 22 पालकांनी अर्ज भरले आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत यंदा तिप्पट अर्ज आल्याने पालकांची डोकेदुखी वाढली आहे. लॉटरीसह प्रतीक्षा यादीतील पालकांना प्रवेश निश्चितीसाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत 17 मार्चपर्यंत आली होती. मात्र, अनेक पालक अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्याने 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आताही अद्यापही अनेक पालक अर्ज सादर करण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे अर्ज सादर करण्यासाठी पुन्हा वाढ मिळण्याची शक्यता असून, लॉटरीसाठी एप्रिल महिना उजाडण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील आरटीईची स्थिती याप्रमाणे
शाळा : 8,828
उपलब्ध जागा : 1, 01,969
आतापर्यंत प्राप्त अर्ज :3,47,022

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT