Latest

नाशिक : माळवाडीजवळ शिवशाही बस जळून खाक, 45 प्रवासी बचावले

गणेश सोनवणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पुणे महामार्गावर माळवाडी शिवारात बुधवारी ( दि. 2) सकाळी साडेआठच्या सुमारास शिवशाही बसला आग लागली. त्यात ही बस जळून खाक झाली. बस मध्ये जवळपास 45 प्रवासी होते सुदैवाने ते सुखरूप बचावले.

सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसच्या डिझेल टॅंक जवळील भागात धूर निघू लागल्याने जवळून जाणाऱ्या वाहन चालकांनी बस चालक अमित खेडेकर यांच्या सदर बाब लक्षात आणून दिली. त्यानंतर चालकाने बस (एम एच 06 बी डब्ल्यू 0640) रस्त्याच्या कडेला उभी केली व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर बसमध्ये आगीचा भडका उडाला. सिन्नर नगर परिषदेसह एमआयडीसीच्या अग्निशमन बबांना पाचारण करण्यात आले. दोन्ही बंबांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. मात्र बस पूर्णतः जळून खाक झाली.

ही बस पुणे येथील वल्लभ नगर आगाराची असल्याचे समजते. ती नाशिकहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. सिन्नर नगर परिषद अग्निशमन विभागाचे लाला वाल्मिकी, जयेश बोरसे, लक्ष्मण सोनकुसरे, नवनाथ जोंधळे तसेच एमआयडीसी अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी अतुल सोनवणे, ए. वाय. पवार, चालक सोनवणे, चव्हाण आदींसह कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT